पैठण, (प्रतिनिधी): सामाजिक बांधिलकी जपत स्वमान फायनान्स शाखा पैठण यांच्या वतीने बचत गटातील कर्जदार गरीब महिलांना जीवना आवश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले आहे. काही वर्षांपासून ग्रामीण भागातील महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी वेगवेगळ्या फायनान्स कंपन्याकडून महिलांना बचत गट तयार करून त्या गटातील महिलांना कर्जाचे वाटप करण्यात येत आहे.
मागील एक महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात कोरडा दुष्काळाने मानवी जीवन विस्कळीत झाले आहे. पैठण शहरात स्वमान फायनान्स कंपनीची शाखा असून या कंपनी कडून दुष्काळाच्या काळात मजूरवर्गाची हलाखीची परिस्थिती लक्षात घेऊन सदरील स्वमान फायनान्स कंपनीचे संभाजीनगर विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक जळबाजी डोंगरे, क्षेत्र व्यवस्थापक अजय खूनकर व शाखा प्रमुख, अर्जुन शेलार यांच्या मार्गदर्शना खाली सामाजिक बांधीलकी जपत करंजखेडा ता. पैठण जि. संभाजीनगर येथील कर्जदार महिला सदस्यांना दुष्काळा सारख्या संकटच्या काळात एक मत म्हणून, कंपनीच्यावतीने अन्नधान्य व किराणा वस्तुचे कीट, वाटप करण्यात आले आहे.
याप्रसंगी प्रमुख पाहणे गावचे पोलिस पाटील रामेश्वर रंधे, ग्रामपंचायत सदस्य बद्रि शेरे, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व स्वमान फायनान्स कंपनीचे सर्व कर्मचारी वर्ग हे उपस्थित होते.















